सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 राज्य

विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचा मोदी निवासाबाहेर ठिय्या; काँग्रेस खासदारांची जोरदार घोषणाबाजी

डिजिटल पुणे    21-07-2026 16:18:47

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते.

दिल्लीतील जंतर-मंतर ते संसद भवन मोर्चादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर आज थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन छेडण्यात आले.

ठिय्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी धर्मेंद्र प्रधान, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. "विद्यार्थ्यांवरील दडपशाही थांबवा", "लोकशाही वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींसह अनेक काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

दरम्यान, संसद परिसरात माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध केला. "हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. या विषयावर संसदेत चर्चा व्हावी, अशी आमची मागणी होती. विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप याबाबत माफी मागितलेली नाही," असा आरोप राहुल गांधी यांनी केला.


 Give Feedback



 जाहिराती