सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 विश्लेषण

एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू; अजितदादांच्या जयंती आणि फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची भावनिक पोस्ट

डिजिटल पुणे    22-07-2026 12:07:31

मुंबई :राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. बारामती येथे 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. त्यानंतर आज त्यांची पहिली जयंती आहे. अशातच ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी पवार कुटुंबीयांनी भेट दिली आहे. एकीकडे अजित पवार यांच्या पहिल्या जयंती निमित्त राज्याच्या राजकारण शोककळापसरली आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील वाढदिवस आहे. या प्रसंगावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास पोस्ट करत एका डोळ्यांत आनंद आणि एका डोळ्यांत अश्रू असल्याची भावना व्यक्त केली आहे.

22 जुलै हा दिवस महायुतीसाठी भावनिक आणि आनंदाचा संगम असल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांनी खास शुभेच्छा संदेशही दिला.

अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देताना शिंदे म्हणाले की, "एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू असा आजचा दिवस आहे." अजित पवार यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, मात्र त्यांनी पाहिलेल्या समृद्ध महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढील वाटचाल सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना संघटित ठेवण्यापासून ते प्रशासनावर प्रभावी पकड ठेवण्यापर्यंत अनेक गुण अजित पवार यांच्याकडून शिकायला मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

याच पोस्टमध्ये शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला. अभ्यासू, दूरदृष्टी असलेले, विकासाभिमुख आणि जनतेशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व अशी त्यांची प्रशंसा करत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शिंदे यांनी आपल्या संदेशात "शेक्सपिअर म्हणतो, 'नावात काय आहे?', पण मी म्हणतो, 'देवेंद्र... बस नाम ही काफी है!'" असे म्हणत फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील "बिग डी" अशी उपमा दिली. डिव्होशन, डेडिकेशन, डिटरमिनेशन, डिसिप्लिन आणि डेअरिंग या गुणांचा उल्लेख करत त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

पोस्टच्या शेवटी शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व अधिक बळकट व्हावे आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील यशाचा आलेख सातत्याने उंचावत राहावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.


 Give Feedback



 जाहिराती