सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 शहर

विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात.. काँग्रेस पक्ष मैदानात ! राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध

डिजिटल पुणे    22-07-2026 14:17:25

पुणे : देशातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी व हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सनदशीर, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना क्रूर मोदी सरकारने या विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ला चढवला. या अमानुष अत्याचारांच्या विरोधात देशाचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय श्री. राहुलजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय श्री. मल्लिकार्जुन खरगे साहेब, खा.प्रियांकाजी गांधी यांनी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. मोदी सरकारने या सर्व नेत्यांवरही पोलीस बळाचा क्रूर वापर केला.

पुणे शहर हे नेहमीच विद्यार्थी चळवळीचे व तरुणाईच्या संघर्षाचे केंद्रस्थान राहिले आहे. पुण्यातूनही विद्यार्थ्यांच्या हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यातील राजभवनाच्या प्रवेशद्वारावर काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून २२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, हजारो विद्यार्थ्यांचे रक्त सांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी काँग्रेस पक्ष अखेरपर्यंत लढणार हा निर्धारही सर्वांनी व्यक्त केला.

आपले मनोगत व्‍यक्त करताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘सरकार भ्रष्टमुक्त सरकार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये पेपरफूटी, राम मंदिरातील दानपेटीतून १४०० कोटी रूपये चोरीला जाणे हे या सरकारचे अपयश आहे. आपली चूक मान्य करून पंतप्रधानांनी त्वरीतच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. देशभरातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करीत आहेत. भारतातील अनेक शहरामध्ये विद्यार्थांनी आंदोलन करून मोदी सरकारच्या विरूध्द आपला निषेध व्‍यक्त केला. मोदी सरकारने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अभय दिले . शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला चांगले शिक्षण मिळून नीट सारख्या परिक्षेमध्ये उत्तीर्ण होवून चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. पंतप्रधान मोदींनी यांचे स्वप्न भंग केले आणि शांततेने निदर्शन करणाऱ्या विद्यार्थांवर पोलीसांमार्फत लाठी हल्ला केला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला पाहिजे.’’ 

पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘गेली १ महिना दिल्लीच्या जंतर-मंतर येथे ठिय्या आंदोलन करीत विद्यार्थी केंद्रिय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. देशात लाखो विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी नीटची परिक्षा देतात. त्यासाठी दिवसातील ९ ते १० तास अभ्यास करतात. केंद्र सरकार पेपरफूटी रोखण्यात अपयशी ठरले आहे. या नीट फूटीच्या प्रकरणामध्ये अनेक कोचिंग क्लासेसचे व महाविद्यालयांचे प्राध्यापक यांनी एक साखळी तयार करून पैशाच्या लाभापोटी विकले गेले. पेपरफूटीमळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीव गमावले. सरकारने या विषयाकडे दुर्लक्ष केले. न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीसांमार्फत जो लाठी हल्ला झाला त्याचा मी तीव्र निषेध करीत आहे.’’

 

 

यावेळी काँग्रेस पक्षाच्या पुणे (पश्चिम) शहराध्यक्ष श्रीमती दीप्तीताई चवधरी, नीताताई रजपूत, श्री. अविनाश साळवे, रफिकभाई शेख, अविनाश बागवे, मेहबूबभाई नदाफ, मोहसीनभाई शेख, लताताई राजगुरू , भाऊसाहेब आजबे, प्रियंका रनपिसे, विठ्ठल गायकवाड, हर्षल हांडे, यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.


 Give Feedback



 जाहिराती