सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 विश्लेषण

'अहंकारी सत्तेचा शेवट जवळ'; राहुल गांधींच्या अटकेच्या कारवाईवर अभिनेता हेमंत ढोमेची टीका

डिजिटल पुणे    22-07-2026 14:55:17

मुंबई : दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींना पोलिसांनी उचलून नेतानाचा फोटो शेअर करत त्यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

ढोमे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतानाचा फोटो शेअर करत, "भारताच्या विरोधी पक्षनेत्याला अशा पद्धतीने उचलून नेणाऱ्या अहंकारी सत्तेचा अंत जवळ आला आहे. आता देशातील तरुणच तुम्हाला सत्तेतून दूर करतील," अशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली.

यापूर्वीही त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न, नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या नव्या प्रतिक्रियेचीही मोठी चर्चा होत आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली असून, या मुद्द्यावर देशभरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती