सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 राज्य

NEET पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे निर्देश

डिजिटल पुणे    23-07-2026 12:56:31

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टद्वारे त्यांनी पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देत फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.

मोदी म्हणाले की, "देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपरफुटीच्या प्रत्येक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि खटल्यांचा जलद निकाल लागावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना केली जाईल. संबंधित विभागांनी याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी." तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जंतर-मंतरवरील आंदोलन कायम

दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग 34 व्या दिवशीही सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असून, सरकारसोबत अद्याप कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. त्यामुळे आंदोलन कधी आणि कशा मार्गाने संपुष्टात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोनम वांगचुकांची सशर्त उपोषण मागे घेण्याची तयारी

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 26 वा दिवस आहे. सध्या त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून, तेथूनच त्यांनी उपोषण सुरू ठेवले आहे. सरकारला पाठवलेल्या पत्रात त्यांनी काही अटींसह उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी सरकारने लेखी हमी द्यावी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, संसदेत या प्रकरणावर चर्चा करून जबाबदारी निश्चित करावी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, अशा प्रमुख मागण्या वांगचुक यांनी केल्या आहेत. सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही, तर उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


 Give Feedback



 जाहिराती