सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळित;चिखल अन् खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; उपाययोजनांची मागणी
  • आदित्य ठाकरेंचा मुंबईतील आंदोलनातून अभिजित दिपकेंना कॉल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे , दिपकेंचा निर्धार
  • गुजरात-आसाममध्ये पावसाचा तांडव; 872 गावे पाण्याखाली, लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत; IMD कडून रेड अलर्ट
  • : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
 राज्य

दिल्लीत विठू माऊलीचा गजर; ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात;‘पंढरपूर वारी’ वरील माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग

डिजिटल पुणे    24-07-2026 11:22:29

नवी दिल्ली : राजधानीतील आजची संध्याकाळ विठू नामाच्या गजरात भक्ती रसात न्हाऊन निघाली. निमित्त होते महाराष्ट्र सदन, सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझे माहेर पंढरी’ या विशेष भक्तीसंध्येचा कार्यक्रमाचे! अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून  वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या सहकार्याने निर्मित ‘पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ या विशेष माहितीपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले.

महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाने दिल्लीकरांना विठ्ठल भक्ती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा अनोखा अनुभव दिला. महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, सौ. प्रतिभा पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मेधा कुलकर्णी, बजरंग सोनवणे, भाऊसाहेब वाकचौरे, रामराव वडकुते, श्रीरंग बारणे, राजेंद्र जैन आणि ओमराजे निंबाळकर आदींसह केंद्रीय सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

शमिमा अख्तर यांच्या सुरांनी जिंकली मने

या भक्तीसंध्येचे प्रमुख आकर्षण ठरल्या त्या प्रसिद्ध गायिका शमिमा अख्तर. काश्मीर खोऱ्यातील शमिमा अख्तर यांनी आपल्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजात “माझे माहेर पंढरी”, “आजि सोनियाचा दिनू” तसेच मराठी अभिमान गीत “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” यांसह विविध अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या सहकार्याने निर्मित ‘Pandharpur Wari : In The Footsteps of Saints’ (पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा) हा माहितीपट यावेळी प्रदर्शित करण्यात आला.महाराष्ट्राची ऐतिहासिक संतपरंपरा, वारीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करणारा हा माहितीपट मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा नऊ भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. सार्क देशांसह डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, ॲनिमल प्लॅनेट आणि आयडी आदी विविध वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या या माहितीपटाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सरहद ‘चे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी केले. या अनोख्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, ‘सरहद’चे समन्वयक लेशपाल जवळगे, शैलेश पगारिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मीता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते आदींसह महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, विविध मान्यवर, दिल्लीतील मराठी नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमामुळे महाराष्ट्र सदन परिसरात जणू पंढरीच अवतरली होती.

 

 


 Give Feedback



 जाहिराती