सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळित;चिखल अन् खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; उपाययोजनांची मागणी
  • आदित्य ठाकरेंचा मुंबईतील आंदोलनातून अभिजित दिपकेंना कॉल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे , दिपकेंचा निर्धार
  • गुजरात-आसाममध्ये पावसाचा तांडव; 872 गावे पाण्याखाली, लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत; IMD कडून रेड अलर्ट
  • : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
 शहर

गुरुपौर्णिमेनिमित्त कलावर्धिनी' कडून ‘अनुग्रह’ भरतनाट्यम् नृत्याविष्कार

डिजिटल पुणे    24-07-2026 18:11:48

पुणे : भारतीय संस्कृतीतील गुरू–शिष्य परंपरेचा गौरव करणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि कलावर्धिनी डान्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनुग्रह’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे करण्यात आले आहे.कर्नाटक संगीत परंपरेतील महान संत-संगीतकार आणि कर्नाटक संगीत त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या श्री मुथुस्वामी दीक्षितार यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यांच्या संगीतवैभव, काव्यसौंदर्य, तात्त्विक विचार आणि भक्तिभाव यांचे दर्शन घडविणाऱ्या निवडक रचनांचे भरतनाट्यम् माध्यमातून विशेष सादरीकरण करण्यात येणार आहे.'कलावर्धिनी'च्या वतीने अरुंधती पटवर्धन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

 कार्यक्रमात ज्येष्ठ भरतनाट्यम् गुरू डॉ. सुचेता भिडे-चाफेकर यांचे विशेष नृत्यसादरीकरण असून  कलावर्धिनी डान्स कंपनीचे ५० हून अधिक नृत्यांगना, नृत्यांगनांचे प्रशिक्षक आणि शिष्यवर्ग एकत्रितपणे भव्य समूहनृत्य सादर करणार आहेत.‘अनुग्रह’ हा केवळ भरतनाट्यम् नृत्याविष्कार नसून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा, भारतीय शास्त्रीय कलेतील गुरू–शिष्य परंपरेचा गौरव करणारा आणि अध्यात्म, साधना व कलात्मक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करणारा एक आगळावेगळा सांस्कृतिक सोहळा आहे. या कार्यक्रमात विविध पिढ्यांतील शिष्य एकत्र येऊन आपल्या गुरूंना नृत्यरूपाने आदरांजली अर्पण करणार आहेत.प्रवेश विनामूल्य आहे. 


 Give Feedback



 जाहिराती