सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 राज्य

NEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा; जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

डिजिटल पुणे    25-07-2026 15:35:42

नवी दिल्ली : NEET-UG परीक्षा गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केला. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता. दिल्लीसह मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटीसह विविध राज्यांत या आंदोलनाला पाठिंबा मिळाल्याने केंद्र सरकारवर दबाव वाढला होता.

राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देशातील विद्यार्थ्यांचे हित, शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास आणि राष्ट्रीय एकता जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. जंतर-मंतरवरील परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक भविष्य अडचणीत येऊ नये, यासाठी आपण स्वेच्छेने पद सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रधान यांनी आपल्या पत्रात सांगितले की, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेतील अनियमिततेनंतर केंद्र सरकारने तत्काळ CBI चौकशीचे आदेश दिले, परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेतली आणि पुढील वर्षापासून परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णयही जाहीर केला. 21 जून रोजी पुनर्परीक्षा सुरळीत पार पडल्याचा तसेच 16 जुलैला जाहीर झालेल्या निकालात लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

आपल्या चार दशकांच्या सार्वजनिक जीवनात शिक्षण क्षेत्रासाठी सातत्याने काम केल्याचे सांगत प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या भावना आणि आकांक्षांचा आदर असल्याचे नमूद केले. "हा निर्णय वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून देशातील युवाशक्तीचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आहे," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

राजीनाम्याच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, मंत्रिमंडळातील सहकारी, मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी आणि देशातील जनतेचे आभार मानत भविष्यातही राष्ट्रसेवेसाठी समर्पित राहण्याची ग्वाही दिली.


 Give Feedback



 जाहिराती