सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
  • पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
  • रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
 क्राईम

13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप; डीएनए अहवाल ठरला निर्णायक पुरावा

डिजिटल पुणे    27-07-2026 12:36:42

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात मालेगाव येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने आरोपी सुनील रामदास जाधव याला दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली ही कठोर शिक्षा दिली.

या प्रकरणात पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होता. त्यानंतर झालेल्या शवविच्छेदनात ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. पीडिता, आरोपी आणि गर्भाचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. फॉरेन्सिक अहवालात आरोपीच गर्भाचा जैविक पिता असल्याचे स्पष्ट झाल्याने हा पुरावा न्यायालयीन सुनावणीत अत्यंत महत्त्वाचा ठरला.

सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी आरोपीला दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावली.हे प्रकरण नोव्हेंबर २०१९ मधील असून, सातत्याने होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळे पीडितेचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अहवाल, डीएनए तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीविरोधातील आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करत कठोर शिक्षा सुनावली.


 Give Feedback



 जाहिराती