सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 शहर

पुण्यात पुढील दोन दिवस हलक्या सरींचा अंदाज; ढगाळ वातावरणाची शक्यता कायम

डिजिटल पुणे    27-07-2026 13:03:39

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या कालावधीत शहरात ढगाळ वातावरण कायम राहणार असून नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी (२६ जुलै) सकाळी शहरातील विविध भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने हवेत दमटपणा जाणवला. अधूनमधून ऊन पडत असल्याने दिवसभर ऊन-पावसाचा लपंडाव अनुभवायला मिळाला.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, रविवारी पाषाण परिसरात सर्वाधिक ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शिवाजीनगर, एनडीए, लोहगाव आणि कोरेगाव पार्क येथे २ ते ४ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला.

गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसानंतर आता पावसाची तीव्रता कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. पुढील दोन दिवस हलक्या सरींचा अंदाज असून त्यानंतरही शहरात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमाल तापमानात किंचित वाढ होऊ शकते, तर घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


 Give Feedback



 जाहिराती