सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
  • पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
  • रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
 क्राईम

पिंपरी-चिंचवड हादरले! दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी 65 वर्षीय आरोपी अटकेत

डिजिटल पुणे    28-07-2026 12:43:30

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय रमजान बागवान याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिच्या अवघ्या 4 वर्षीय बहिणीवरही एकदा अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित मुलींचे आई-वडील, आजी-आजोबा आणि काका हे सर्वजण मजुरीचे काम करतात. आरोपीचे कुटुंबही त्याच परिसरात राहत असून त्यांचीही उपजीविका मजुरीवरच आहे.

घटनेच्या दिवशी सकाळी मोठी मुलगी शाळेत गेली होती. ती दुपारी घरी आल्यानंतर घरातील इतर सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी दोन्ही बहिणी घरात एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत आरोपीने परिसरात कोणी नसल्याची खात्री करून मुलीला आपल्या घरी नेल्याचा आरोप आहे. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या निदर्शनास आला. संबंधित महिलेने संध्याकाळी मुलीचे पालक घरी आल्यानंतर त्यांना याबाबत माहिती दिली.

यानंतर पालकांनी मुलीशी विश्वासाने संवाद साधला असता तिने त्या दिवशी घडलेला प्रकार सांगितला. एवढेच नव्हे, तर यापूर्वीही आरोपीने चार वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच काही दिवसांपूर्वी चार वर्षीय बहिणीलाही लक्ष्य केल्याचा धक्कादायक खुलासा केला. आरोपीने हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या माहितीच्या आधारे पीडित कुटुंबाने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती