सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
  • मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
 शहर

१ ऑगस्टला ‘जी चाहता है’ या सुरेल मराठी मैफलीचे आयोजन

डिजिटल पुणे    28-07-2026 18:15:43

पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘जी चाहता है’ हा हार्मोनियमवरील गाणी आणि मराठी कविता-गप्पांची सुरेल मैफल कार्यक्रम शनिवार, दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार  आहे.या कार्यक्रमात हार्मोनियम वादन संपदा खरे-देशपांडे करतील तर, कविता, कथा आणि निवेदन प्रसाद शिरगांवकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाला की-बोर्डवर अद्वैत कुलकर्णी, तबल्यावर अभिजित जायदे तसेच रिदम मशीन आणि ऑक्टोपॅडवर अथर्व केळकर यांची साथ लाभणार आहे.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  आयोजित हा २९९ वा कार्यक्रम असून सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती  भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हार्मोनियम वर लोकप्रिय मराठी हिंदी गीते, मराठी कविता, कथा आणि सुरेल संगीत यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती