सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
  • पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
  • रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
 जिल्हा

रायगड जिल्ह्यातील क्रशर चालकांचे बंद ट्रेडिंग लायसन्स पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय लवकरच – महसूलमंत्री बावनकुळे

डिजीटल पुणे    30-07-2026 11:14:01

मुंबई – रायगड जिल्ह्यातील क्रशर चालकांचे बंद असलेले ट्रेडिंग लायसन्स पूर्ववत सुरू करणे आणि सिडको क्षेत्रातील जमीन सपाटीकरणाबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यातील स्टोन क्रशर संघटना व खाण व्यावसायिकांच्या प्रलंबित समस्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार विक्रांत पाटील आणि रायगडमधील खाण व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीमुळे एप्रिल महिन्यापासून अडचणीत सापडलेल्या स्थानिक क्रशर व खाण उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. खाण मालकांनी एप्रिल महिन्यापासून क्रशर व खाण परिसराला सील ठोकण्यात आल्याचे सांगितले.

लीज नूतनीकरणाचे अर्ज प्राप्त झाले आहेत तथापि प्रादेशिक नियोजन झोनमध्ये क्रशर चालवण्यास नियमानुसार परवानगी देता येत नसल्याचे सिडकोमार्फत स्पष्ट करण्यात आले.यावर महसूलमंत्र्यांनी संबंधित भाग हा मूळ खाण क्षेत्र असेल, तर त्याचा समावेश प्रादेशिक उद्यान क्षेत्रात होत नाही, केवळ गार्डन किंवा इतर पार्कसाठी आरक्षण असलेल्या ठिकाणी नियमाधीन राहून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


 Give Feedback



 जाहिराती