सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
  • पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
  • रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
 शहर

तपासाच्या बहाण्याने कास पठाराची सहल; महिला अधिकाऱ्यासह तीन पोलिसांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखली

डिजिटल पुणे    30-07-2026 17:42:31

पुणे : गुन्ह्याच्या तपासासाठी साताऱ्यात गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाने अधिकृत कामाऐवजी पर्यटनाला प्राधान्य दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या पुढील दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढीवर स्थगिती घालण्यात आली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासासाठी ४ एप्रिल रोजी संबंधित पथक महिला फिर्यादीला सोबत घेऊन साताऱ्यात गेले होते. मात्र, तपासाची प्रक्रिया पूर्ण न करता त्यांनी कास पठारासह परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिल्याचे विभागीय चौकशीत उघड झाले.

चौकशीनुसार, साताऱ्यात पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांशी समन्वय साधण्याऐवजी पथकाने प्रथम एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात औपचारिक नोंद करून केवळ नावालाच पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी सखोल चौकशी किंवा साक्षीदारांची माहिती घेण्याची आवश्यक प्रक्रिया करण्यात आली नाही.

यानंतर पथकाने पुण्याकडे परतण्याऐवजी कास पठार आणि अन्य पर्यटनस्थळांची सफर केली. दरम्यान, सोबत असलेल्या महिला फिर्यादीने घरी आजारी आई असल्याने लवकर पुण्यात परतण्याची विनंती केली होती. मात्र, तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

पर्यटनानंतर हे पथक रात्री उशिरा पुण्यात परतले. महिला फिर्यादीला सुरक्षितपणे घरी सोडण्याऐवजी तिला प्रथम स्वारगेट येथे उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिच्या आग्रहानंतर अखेर शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ तिला सोडण्यात आले. या प्रकारामुळे महिला सुरक्षेबाबतही गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे निष्पन्न झाले.

या संपूर्ण घटनेची विभागीय चौकशी झाल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा, बेशिस्तपणा आणि सेवाशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संबंधित तिन्ही पोलिसांची पुढील दोन वर्षांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची दंडात्मक कारवाई केली.


 Give Feedback



 जाहिराती