सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
  • पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
  • रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
 शहर

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट

डिजिटल पुणे    30-07-2026 17:46:23

पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज भेट देऊन कामाची पाहणी केली.स्मारकाच्या उभारणीची प्रगती, वास्तुरचना आणि संवर्धनाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती, विविध टप्प्यांतील प्रगती तसेच पुढील नियोजनाची माहिती मंत्री श्री. भुजबळ यांना दिली.भिडेवाडा हे भारतीय समाजसुधारणेच्या आणि स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे प्रेरणास्थान असल्याने स्मारकाचे काम ऐतिहासिक वारशाचे जतन करत दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, सार्वजनिक बांधकाम (इलेक्ट्रिकल) विभागाचे मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, वास्तुविशारद धनंजय साळकर, उपायुक्त अविनाश सकपाळ, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त तुषार बाबर उपस्थित होते


 Give Feedback



 जाहिराती