सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'पाऊस
  • पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
  • मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
  • सोलापुरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, 10 प्रवासी जखमी
  • रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
 जिल्हा

अलिबाग तालुक्यातील मुळे येथे पाणंद रस्त्याची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी

डिजिटल पुणे    01-08-2026 13:20:26

रायगड-अलिबाग: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुळे या गावातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची पाहणी केली.यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील, सदस्या मानसी दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतापर्यंत सहज पोहोचता येणार असून, शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे.ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देत शेतकऱ्यांच्या विकासाला गती देणारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सरकारच्या विविध विकासकामांचा वेग वाढवून जिल्ह्यातील जनतेला अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही ते शेवटी म्हणाले.


 Give Feedback



 जाहिराती