पुणे : बाबुरावजी घोलप महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॅा. संगीता जगताप यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सांस्कृतिक समन्वयक प्रा. अपर्णा पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करताना त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील विविध पैलू स्पष्ट केले. त्यांची देशभक्ती त्यांची निर्भीड पत्रकारिता सर्वसामान्य लोकांशी असणारा त्यांचा संपर्क सामान्यांच्या मनामध्ये जागृत केलेली स्वराज्याची जाणीव याविषयी त्यांनी सांगितले. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत त्यांच्या लेखनातून शोषितांचे आणि वंचितांचे जीवन दर्शन घडलेले आहे याविषयी सांगितले.
प्राचार्या डॅा. संगीता जगताप यांनी मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत आपल्या मार्गदर्शनात टिळकांचे व अण्णाभाऊ साठे यांचे गुण आपण आत्मसात केले पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी लोकमान्य व साहित्यरत्न यांच्या कार्याचा आढावा घेतला.तसेच भूगोल विभाग प्रमुख डॉ. रमाकांत कसपटे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या छक्कड, लावणी यांविषयी माहिती दिली. रोशनी राठोड ,अनिता चौधरी, कृतिका कांबळे या विद्यार्थिनींनी ही मनोगते व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सांस्कृतिक समितीतील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यामध्ये प्रा. रूपाली बनकर, प्रा.डॉ. चंदा हसे, डॉ. अमृता इनामदार, प्रा. प्रीती जोशी, प्रा.शितल नलवडे प्रा. शर्मिला देवकाते यांचा सक्रिय सहभाग लाभला कार्यक्रमाचे सुंदर छायाचित्रण श्री. प्रणित पावले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रूपाली बनकर यांनी केले तर आभार वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंदा हसे यांनी मानले.
महाविद्यालयातील विविध शाखेतील विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापक इतर वर्ग , विद्यार्थी उपस्थित होते.यावर्षीपासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यानुसार लेखन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी वाणिज्य शाखेतील डॉ. मनिषा त्र्यंबके, डॉ. अमृता इनामदार, प्रा. सुषमा सोनार , डॉ. रश्मी भुयान,कला शाखेतील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भरत राठोड, डॉ. राजेंद्र भोईवार, प्रा. अक्षय कामठे, प्रा. शर्मिला देवकाते यांनी परिश्रम घेतले. आणि या कार्यक्रमाचे संयोजन उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अपर्णा पांडे यांनी केले.