पुणे : आंबेगाव खुर्द- येथील जांभुळवाडी रोडवरील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सर्व सभासदांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुरव होते.
प्रारंभी सचिव म्हाळसाकांत जोशी, सहसचिव वैजनाथ शेटे आणि नामदेवराव पवार, आजीव सभासद यांचे हस्ते दोन्ही राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी म्हाळसाकांत जोशी सचिव यानी अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाचनालयास भेट म्हणून दिली.
थोर पुरुषांच्या राष्ट्रभक्तीच्या शिकवनीचे, आदर्श देशभक्तीचे अनुकरण करणे गरजेचे आहे. या प्रकारच्या थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंती मुळे ज्येष्ठाना सदैव देशभक्तीचे स्मरण राहील असे विचार सर्व व्यक्तींनी आपल्या भाषणात व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.
याप्रसंगी चंद्रकांत गुरव, संजय रणसिंग, म्हाळसाकांत जोशी, वैजनाथ शेटे, नितीन कुलकर्णी, चंद्रकांत फडतरे, नामदेव पवार, अशोककुमार निवंगुणे, सतीश मंगरूळे, ज्ञानेश्वर वाघमारे यांची राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा गौरव करणारी भाषने केली. या कार्यक्रमास चंद्रकांत थोरात,भास्कर चव्हाण, शिवदास खटे,दिलीप तोडकर,गुलाब शेळके, चंद्रकांत इंगळे या आजीव सभासदांची सुद्धा उपस्थिती होती. शेवटी आज सभासद नामदेवराव पवार यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
.