पुणे : सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार श्री राजेंद्र राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता निगडी येथील सीझन्स बँक्वेट अँड लॉन्स येथे होणार आहे.
हा सत्कार सोहळा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री माधुरी मिसाळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे , आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार मिमराव तापकीर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विधानपरिषद सदस्या उमा खापरे, विधानपरिषद सदस्य योगेश टिळेकर, विधानपरिषद सदस्य अमित गोरखे, आमदार राहुल कुल तसेच ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना एकत्र आणून परस्पर संवाद, स्नेह आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सोलापूरकरांना एकाच व्यासपीठावर आणण्याबरोबरच नव्याने निवडून आलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा सोलापूरकरांसाठी स्नेह, संवाद आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.या बाबत अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा - ९७३०१४८८१६, ९८५०९४९०००, ९८५०२९३९८९