सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
  • महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता
 शहर

खडकवासला धरणसाखळीत विक्रमी जलसाठा; जुलैत २४.५४ टीएमसीची भर, पाणीटंचाईची चिंता दूर

डिजिटल पुणे    03-08-2026 12:32:35

पुणे : यंदाचा जुलै महिना खडकवासला धरणसाखळीसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. अवघ्या महिनाभरात धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल २४.५४ टीएमसी इतकी वाढ झाली असून, गेल्या पाच वर्षांतील हा सर्वाधिक जलसाठा ठरला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही वाढ केवळ १०.६७ टीएमसी इतकी होती.

जून महिन्यात मान्सूनने अपेक्षित जोर दाखवला नव्हता. मात्र, जुलैमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ५६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा केवळ १३३ मिलिमीटर इतकाच होता.

एक जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत खडकवासला धरणात १.५८ टीएमसी, पानशेतमध्ये ८.६१ टीएमसी, वरसगावमध्ये ११.०९ टीएमसी आणि टेमघरमध्ये ३.२६ टीएमसी इतकी पाणीसाठ्यात भर पडली. विशेष म्हणजे, पानशेत आणि वरसगाव धरणांमध्ये जुलै महिन्यातील ही वाढ गेल्या पाच वर्षांतील उच्चांक ठरली आहे.

जुलैमध्ये केवळ सुमारे १५ दिवस पाऊस झाला असला, तरी तो अत्यंत जोरदार असल्याने अल्पावधीतच धरणे भरली आणि काही धरणांतून विसर्गही करावा लागला. हवामान बदल आणि बदलत्या पावसाच्या पद्धतीचा हा परिणाम असल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे.या विक्रमी जलसाठ्यामुळे पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता सध्या पूर्णपणे दूर झाली असून, आगामी काळातील पाणीपुरवठाही अधिक सुरक्षित झाल्याचे चित्र आहे.


 Give Feedback



 जाहिराती