सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
  • महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता
 शहर

सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

गजानन मेनकुदळे    03-08-2026 15:28:47

पुणे :  दिनांक रविवार 2,/8/26 रोजी प्रहार सामाजिक संघटना दिव्यांग क्रांती संघटना दिव्यांग प्रहार चॅरिटेबल ट्रस्ट शिवसेना शिंदे गट खोतवाडी, इचलकरंजी यांच्या विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच शिवभिम महोत्सव 2026 या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमदार व माजी राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू , आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय प्रकाश आबिटकर साहेब माननीय खासदार धैर्यशील माने माननीय आमदार राहुल आवडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांमध्ये पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते  तानाजी कांबळे यांना शिवभिम महोत्सव  2026 समाज रत्न या पुरस्काराने आमदार बच्चुभाऊ कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजक व प्रहार साप्ताहिक चे संपादक व प्रहार न्यूज चे व्यवस्थापक विकास गायकवाड , प्रकाश कांबळे ,गणेश शिंदे सर इतर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,तानाजी कांबळे हे सध्या पी एम पी एम एल स्वारगेट येथे वाहक या पदावर काम करत असून अनेक वर्षापासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.

सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यात स्वतः कार्यरत असतात रक्तदान शिबिरे , आरोग्य अभियान, महापुरुषांच्या जयंती उत्सव, व इतर परिसरातील सामाजिक प्रश्न   सातत्याने मांडत असतात दिव्यांग व निराधार यांचे पेन्शन वाढ संदर्भात ,  वृक्षारोपण , ग्रामीण व शहरी भागातील विविध शैक्षणिक फी वाढ कमी व माफ करण्या संदर्भात ,आरोग्य शिबिर , दिव्यांग दिन ,ज्येष्ठ नागरिक दिन प्रवासी दिन, अतिशय तत्परतेने साजरे करत असतात. यापूर्वी कोरोना काळातील त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली याबद्दल पुणे महानगरपालिका सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय येथे त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला आहे. पीएमपी  कडूनही उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा आदर्श सेवक इतर उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक वेळा सन्मान झाला आहे  . या समाज रत्न पुरस्कार सन्मान मिळाल्यामुळे त्यांचे मित्रमंडळी, कर्मचारी नागरिक यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती