पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड पुणे येथे केंद्र शासनाच्या नशा मुक्त भारत अभियान या उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ विरोधी समिती मार्फत विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत याची सुरुवात विद्यार्थ्यांना अमली पदार्थ न घेण्याची सामूहिक शपथ देण्यात आली यानी सुरुवात झाली. या वेळी डॉ.श्रीनिवास ईपलपल्ली, डॉ. शोभा तितर, डॉ. प्रकाश हुंबाड, डॉ. हिमालया सकट, प्रा. संतोष मोरे, डॉ. रुपाली शेंडकर, डॉ. आदिनाथ पाठक उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. श्रीनिवास ईपलपल्ली म्हणाले अमली पदार्थांचा अति वापर ही एक अशी समस्या आहे जी देशाच्या सामाजिक जडणघडणीवर विपरित परिणाम करत आहे. कोणत्याही अमली पदार्थावर अवलंबित्वामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरच केवळ परिणाम होत नाही तर त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण समाजही विस्कळीत होतो.
विविध मनोविकारी पदार्थांचे सतत सेवन केल्याने व्यक्तीचे त्यावरील अवलंबित्व वाढते. काही पदार्थांच्या सेवनामुळे न्यूरो-मानसिक विकार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, तसेच अपघात, आत्महत्या आणि व्यक्ती हिंसक होणे असे प्रकार होऊ शकतात. म्हणून, अमली पदार्थांचा वापर आणि अवलंबित्व याकडे मानसिक-सामाजिक-वैद्यकीय समस्या म्हणून पाहण्याची गरज आहे. उपक्रमाचे आयोजन अंमली पदार्थ विरोधी समिती प्रमुख डॉ अशोक शेळके, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ रुपाली शेंडकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोरे, कार्यालय प्रमुख आशिष परमार यांनी केले.