पुणे जिल्हा जंगम पुरोहित संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण ६ ऑगस्ट रोजी
पुणे, दि. ५ ऑगस्ट : धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा तसेच वेदविद्या क्षेत्रात परंपरेला आधुनिकतेची जोड देत समाजात एकसूत्रता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पुणे जिल्हा जंगम पुरोहित संस्था यांच्या वतीने संस्थेच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण सोहळा गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे–सातारा रस्ता, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, पद्मावती, पुणे – ४११०३७ येथे संपन्न होणार आहे.
यावेळी प.पू. श्री काशी जगद्गुरूंचे दर्शन व आशीर्वचन लाभणार असून, संस्थेच्या नव्या बोधचिन्हाचे विधिवत अनावरण करण्यात येणार आहे. समाजातील सर्व जेष्ठ, युवक, पुरोहित, धर्मप्रेमी तसेच वीरशैव-लिंगायत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. सोमनाथ हिरेमठ, उपाध्यक्ष श्री. अक्षय मठपती व श्री. अनिकेत जंगम, सचिव श्री. चंद्रकांत जंगम, सहसचिव श्री. गणेश जंगम, खजिनदार श्री. सागर जंगम, सहखजिनदार श्री. महादेव पुराणिक तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.