सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव
  • शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
  • सिंहगड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना : महापौरांचा १५ दिवसांत वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचा आदेश
 शहर

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर १५ दिवसांत कृती आराखडा; महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला निर्देश

डिजिटल पुणे    06-08-2026 13:08:17

पुणे : सिंहगड रस्त्यावरील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने उपाययोजनांच्या हालचालींना वेग दिला आहे. धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव ते दांडेकर पूल या संपूर्ण पट्ट्यातील वाहतूक व्यवस्थेचा सर्वंकष आराखडा पुढील १५ दिवसांत तयार करण्याचे निर्देश महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॉर्डन नियुक्त करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत वाहतूक पोलिस, महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सध्याच्या वाहतूक समस्यांवर सविस्तर चर्चा केली. नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांना दररोज होणारा मनस्ताप लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

बैठकीत नगरसेवकांनी वाहतूक पोलिसांची अपुरी उपस्थिती, विरुद्ध दिशेने वाहनचालकांची वाढती संख्या, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे कोंडी अधिक तीव्र होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सण-उत्सवांच्या परवानग्या देताना वाहतूक व्यवस्थेचा पुरेसा विचार केला जात नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पोलिस आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

याशिवाय अतिक्रमणांवर कारवाई, प्रत्येक महत्त्वाच्या चौकात गर्दीच्या वेळेत पोलिसांची नियुक्ती, अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बसथांब्यांचे स्थलांतर अशा विविध उपाययोजना राबविण्याबाबतही चर्चा झाली.बैठकीच्या शेवटी मंजुषा नागपुरे यांनी पोलिस आणि महापालिकेच्या समन्वयातून सिंहगड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १५ दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.


 Give Feedback



 जाहिराती