सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय फूट मानायची का? ठाकरेंच्या वकिलांचा मोठा सवाल, शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात खल, लवकरच निकाल
  • पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव
  • शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
  • सिंहगड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना : महापौरांचा १५ दिवसांत वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचा आदेश
 शहर

डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ कुलपतीपदी आबेदा पी. इनामदार

डिजिटल पुणे    06-08-2026 15:57:25

पुणे : पुणे कॅम्प येथील 'डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ ' च्या कुलपतीपदी आबेदा पी. इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात त्या ४० हून अधिक वर्षे कार्यरत आहेत. या नियुक्तीनिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव इरफान जे. शेख, इफ्तेकार इनामदार, मुझफ्फर शेख, हाजी कादिर कुरेशी, अफजल खान, शाहिदा सय्यद, मशकूर शेख तसेच आझम कॅम्पसशी संलग्न विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांनी आबेदा पी. इनामदार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना  आबेदा पी. इनामदार म्हणाल्या, "डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाची ओळख घडविणारी मूल्ये कायम दृढ राहतील. शैक्षणिक उत्कृष्टता, प्रामाणिकपणा, सामाजिक उत्तरदायित्व, नावीन्यपूर्ण विचार आणि मानवतेची सेवा हीच आपल्या विद्यापीठाची मूलभूत तत्त्वे असून, त्याच मूल्यांच्या आधारे विद्यापीठाची प्रगती अधिक वेगाने घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."       


 Give Feedback



 जाहिराती