सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय फूट मानायची का? ठाकरेंच्या वकिलांचा मोठा सवाल, शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात खल, लवकरच निकाल
  • पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव
  • शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
  • सिंहगड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना : महापौरांचा १५ दिवसांत वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचा आदेश
 क्राईम

९३ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील दोन फरार आरोपी पुण्यात अटकेत; वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

डिजिटल पुणे    06-08-2026 17:18:54

पुणे : ठाणे शहरातील ९३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना पुणे वाहतूक पोलिसांनी अप्पा बळवंत चौक परिसरातून अटक करून ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले. ठाणे पोलिसांनी दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचत ही कारवाई करण्यात आली.

अक्षय संजय तांबे (वय २२) आणि ओंकार विष्णू शिरसाठ (वय २४, दोघे रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, त्यांनी एका व्यक्तीची तब्बल ९३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

कोपरी पोलिसांकडून सुरू असलेल्या तांत्रिक तपासादरम्यान आरोपी पुण्यातील अप्पा बळवंत चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही माहिती विश्रामबाग वाहतूक शाखेला देण्यात आली आणि संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले.

पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हात्रे, हवालदार खरात व गौड तसेच पोलिस अंमलदार शेख, कानवडे आणि प्रधान यांनी परिसरात सापळा रचून संशयितांची दुचाकी अडवली. प्राथमिक चौकशीत दोघेही ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झाले.यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती