सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 शहर

दूध भेसळ प्रकरणात आणखी 10 जणांना अटक; आरोपींची संख्या 24 वर, राजकीय कनेक्शनच्या चर्चेला पुन्हा उधाण

डिजिटल पुणे    10-08-2026 11:25:36

पुणे : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या दूध भेसळ प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंचर पोलिसांनी या प्रकरणात आणखी 10 जणांना अटक केली असून, त्यामुळे या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. दरम्यान, आजच्या कारवाईनंतर काही आरोपींचे राजकीय पक्षांशी संबंध असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

4 जुलै रोजी एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करत दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या कारवाईनंतर काही आरोपींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याची तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, वळसे पाटील यांनी दूध भेसळ प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ज्या व्यक्तींना दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य पुरवले जात होते, अशा आणखी 10 जणांचा पोलिसांनी शोध घेत त्यांना अटक केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, या भेसळीच्या प्रकारात वास न येणारा शाम्पू, दुधाची पावडर, विविध प्रकारची रसायने आणि इतर भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. या साहित्याच्या माध्यमातून दुधाची भेसळ करून त्याची विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या 10 आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू असून, या भेसळ प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

1. संतोष बबन मोरे (43) – रा. शिरापूर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर

2. दत्तात्रय रामदास भागवत (41) – रा. खडकवाडी, वडदरा, ता. आंबेगाव, जि. पुणे

3. गणेश सुदाम पडवळ (40) – रा. सविंदणे, ढगेवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे

4. आनंदा मारुती पवार (56) – रा. टाकळकरवाडी, ता. खेड, जि. पुणे

5. कुलदीप प्रकाश पवळे (30) – रा. चव्हाण मळा, ता. खेड, जि. पुणे

6. रविराज बबन थोरात (32) – रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे

7. राजेंद्र भगवान सिनलकर (45) – रा. लोणी, ता. आंबेगाव, जि. पुणे

8. ओंकार पोपट गिरवले (28) – रा. देवुळगाव सिद्धी, ता. नगर, जि. अहिल्यानगर

9. आशिष विठ्ठल लोंढे (30) – रा. लोंढेमळा, एकलहरे, ता. आंबेगाव, जि. पुणे

10. सतीश महादु वाबळे (47) – रा. चांडोली खुर्द, काटेमळा, ता. आंबेगाव, जि. पुणे

दूध भेसळ प्रकरणातील तपासाचा पुढील टप्पा काय असणार आणि या टोळीचे जाळे आणखी किती दूरपर्यंत पसरले आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती