सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 जिल्हा

रायगडच्या विकासकामांना गती देत नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करा – मंत्री भरत गोगावले

डिजिटल पुणे    10-08-2026 18:28:08

मुंबई : रायगड जिल्ह्यातील सर्व विभागांनी सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकासकामे व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नागरिकांना शासकीय योजनांचा व सुविधांचा वेळेत लाभ मिळेल, यासाठी विभागांनी समन्वयाने व गतिमान पद्धतीने काम करावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले. रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील विभागनिहाय सद्य:स्थिती (२०२६-२७) बाबत आढावा बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा, प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य रुग्णालयातील सोयी-सुविधा, आरोग्य सेवा तसेच आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संदर्भातील प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी मंत्री गोगावले यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रस्तावांवर तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत व कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पात्र लाभार्थी शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी विभागांनी आवश्यक समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासकामांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा वेळेत व प्रभावीपणे वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मंजूर निधीचा योग्य विनियोग करून विकासकामांना गती देण्याच्या सूचना मंत्री गोगावले यांनी दिल्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती