सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 शहर

'मयत पास' पूर्वीप्रमाणे नगरसेवकांच्या शिफारसपत्रावरच द्यावा' – राजाभाऊ लायगुडे

डिजिटल पुणे    12-08-2026 11:17:15

पुणे  : शहरात ६० वर्षांवरील व्यक्तीचे घरी निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी आवश्यक असलेला 'मयत पास' पूर्वीप्रमाणे नगरसेवकांच्या शिफारसपत्रावर देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.

लायगुडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरासह उपनगरांमध्ये वृद्ध व्यक्तीचे घरी निधन झाल्यास मयत पास मिळविण्यासाठी नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ओळखीचे डॉक्टर उपलब्ध नसल्यास रुग्णालये व दवाखान्यांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागतात.

तसेच, काही डॉक्टरांकडून आवश्यक कागदपत्रांसाठी तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क मागितले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी संबंधित कुटुंबाची आर्थिक तसेच मानसिक पिळवणूक होत असल्याचे लायगुडे यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि अंत्यविधीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मयत पास पूर्वीप्रमाणे नगरसेवकांच्या शिफारसपत्रावरच देण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती