सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 शहर

‘संवाद परिवर्तन यात्रा’ला पुण्यात उत्स्फूर्त सुरुवात; ‘रिअल हिरोजपासून एक दिवस... आयुष्यभराची प्रेरणा!’

डिजिटल पुणे    12-08-2026 11:22:32

पुणे : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण करण्याच्या उद्देशाने पुणे पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद परिवर्तन यात्रा – Moving Inspiration Lab’ या अभियान उपक्रमाची उत्साहात सुरुवात झाली. या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्रातील सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तींशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणणे, त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

उपक्रमाच्या प्रारंभी पुणे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिल्पकार विवेक पटवर्धन, ज्येष्ठ अभ्यासक आनंद सराफ, डॉ. निलेश भोई, अॅड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, सुहास एकबोटे, अजय आबा पाटील, राजू नाईकवरे, अनिरुद्ध पवळे, संजय भेळूमे, राजाभाऊ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

‘संवाद परिवर्तन यात्रा’च्या पहिल्या प्रवासाला सुरुवात करताना विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्याचा आणि आयुष्यात ध्येय निश्चित करून पुढे जाण्याचा संदेश देण्यात आला. “उगवणारा सूर्य अंधार नाहीसा करून आशेची नवी किरणे घेऊन येतो. आपल्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी उद्याचा दिवस नक्कीच नवा प्रकाश घेऊन येऊ शकतो,” असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रशिक्षण घेतल्यानंतर आधुनिक वर्कशॉपमध्ये कौशल्य आत्मसात करून करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच स्वतःच्या अनुभवातून यश मिळवलेल्या व्यक्तींनी संघर्ष, मेहनत आणि जिद्दीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

‘आपला भूतकाळ केवळ आठवणींसाठी नसतो’

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना, “आपला भूतकाळ केवळ आठवणींसाठी नसतो; त्यातून भविष्य घडवण्याची प्रेरणा घ्यायची असते,” असा संदेश देण्यात आला. दिवसागणिक पुणे पोलिस आणि आदर्श मित्र मंडळाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विविध प्रेरणादायी अनुभव देण्यात येणार आहेत.

यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त सिंहगड विभाग, पुणे शहर श्री. विजय कुमार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. समीर गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

‘रिअल हिरोज’च्या भेटीतून विद्यार्थ्यांना नवी दिशा

ज्या मुलांच्या हातात कालपर्यंत गोट्या खेळण्याची ‘रिअल’ फॉरवर्ड होती, त्याच मुलांच्या हातात आज पोलिसांनी दिलेले प्रमाणपत्र आले. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असून, भविष्यात आयुष्यातील दिशा बदलण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

‘संवाद परिवर्तन यात्रा’ केवळ सहल नाही

‘संवाद परिवर्तन यात्रा’ ही केवळ सहल नसून, संवादातून परिवर्तनाचा अनुभव देणारी आणि शिकवण देणारी यात्रा आहे. ‘रिअल हिरोज’कडून प्रेरणा घेऊन कौशल्यातून संधी शोधण्याची आणि नव्या भविष्यासाठी वाटचाल करण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळणार आहे. पुढील ४० मुलांच्या दौऱ्यातही हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती