सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 क्राईम

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला १० कोटींचा गंडा; सायबर पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक

डिजिटल पुणे    12-08-2026 11:25:38

पुणे : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ८ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील फरार आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. रोहन रामेश्वर जाधव (वय २६, रा. सूर्य अपार्टमेंट, गजानन नगर, पिंपळे गुरव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या आधारकार्डचा वापर करून त्यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडले होते. त्यानंतर या प्रकरणात विविध व्यक्तींच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात आले. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भीती दाखवून त्यांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम वळती केली.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि बँक व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. तपासात रोहन रामेश्वर जाधव हा या फसवणूक प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

तपासादरम्यान आरोपींच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले असून, फसवणुकीतील रक्कम विविध खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात यापूर्वीही काही आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपी रोहन जाधव याचे सोशल मीडिया अकाउंट तसेच इतर आर्थिक व्यवहार तपासण्यात आले. आरोपीचे शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झाले असून, तो Instagram वर ‘RohanJadhav’ या नावाने सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पुणे शहर पोलिसांच्या सायबर विभागाकडून सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

नागरिकांना आवाहन : सीबीआय, ईडी, पोलीस किंवा इतर कोणत्याही शासकीय संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल, फोन कॉल किंवा मेसेजद्वारे पैसे मागितल्यास तत्काळ सावध राहावे. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडल्यास १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.


 Give Feedback



 जाहिराती