सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू; आणखी काही जण ढिगाऱ्याखाली, गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला
  • सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''
 जिल्हा

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

डिजिटल पुणे    12-08-2026 13:14:57

मुंबई : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

२१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार असून, राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती