सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू; आणखी काही जण ढिगाऱ्याखाली, गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला
  • सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''
 क्राईम

चाळीसगावात कौटुंबिक वादाचा धक्कादायक शेवट; आई-मुलाकडून पित्याचा मृत्यू

डिजिटल पुणे    12-08-2026 18:36:27

जळगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेहोल येथे कौटुंबिक वादातून  करणसिंग रामसिंग पवार यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पैशांची मागणी केल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात १७ वर्षीय मुलानेही हस्तक्षेप केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, करणसिंग पवार यांनी पत्नी अरुणाबाई यांच्याकडे मोटारसायकल सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला. याचदरम्यान मुलानेही वादात सहभाग घेतला. या घटनेत करणसिंग यांचा मृत्यू झाला.

जमीन विक्री आणि दारूच्या व्यसनावरूनही वाद

या कुटुंबात यापूर्वीपासूनच विविध कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देणे तसेच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून कुटुंबात मतभेद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अरुणाबाई पवार आणि त्यांच्या १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती