सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 DIGITAL PUNE NEWS

शिवमहिम्न स्तोत्राची महिमा आणि निर्मितीची दंतकथा; जाणून घ्या भगवान शिवाच्या स्तोत्राचे महत्त्व

डिजिटल पुणे    13-08-2026 11:51:41

शिवमहिम्न स्तोत्राची महिमा आणि निर्मितीची दंतकथा; जाणून घ्या भगवान शिवाच्या स्तोत्राचे महत्त्व

शिवमहिम्नस्तोत्रम् माहिती

सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाणारे देवाधिदेव भगवान शिव हे सृष्टीची निर्मिती करणारे भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रीमुत्रींपैकी एक होत. भगवान शिव यांची महिमा फार थोर असून ते आपल्या सर्व भक्तांपासून दूर कैलाश पर्वतावर ध्यानिस्थ बसलेले असतात.

बैरागी वृत्ती धारण केली असल्याने या परमेश्वराला कशाचीच आवड नाही. तरी, सुद्धा आपल्या भक्तांच्या हाकेला ते सदैव धावून येत असतात. शिव भक्त त्यांची आराधना करण्यासाठी त्यांना अनेक नावाने संबोधतात.

भगवान शिव यांचा स्वभाव खूप भोळा असल्याने भक्त त्यांना भोलेनाथ म्हणतात. याचप्रमाणे, समुद्र मंथनातून निर्माण झालेले विष त्यांनी आपल्या कंठात धारण केलं असल्याने भक्त त्यांना ‘विषधारी प्रभू नीलकंठ’ म्हणून देखील म्हणतात. भगवान शिव यांच्या कृती प्रमाणे त्यांची अनेक नावे आणि मंदिरे या भूलोकावर अस्तित्वात आहेत.

मित्रांनो, आपल्या पौराणिक धर्म ग्रंथांमध्ये भगवान शिव यांची महिमा सांगणाऱ्या अनेक कथांचे वर्णन करण्यात आलं आहे. भगवान शिव यांची आराधना करण्यासाठीस आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी या करिता सुद्धा ग्रंथांत माहिती देण्यात आली आहे.

आपले धार्मिक ग्रंथ फार प्राचीन कालीन असून त्यांत देवी देवतांची आराधना करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आज आपण या ठिकाणी भगवान शिव यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या शिव महिमा स्तोत्राचे (Shiva Mahimna Stotram) लिखाण करणार आहोत तसचं, या स्तोत्राच्या निर्मिती विषयी प्रचलित असलेल्या दंत कथेचे वर्णन करणार आहोत. जेणेकरून आपणास या शिव महिमा स्तोत्राचे महत्व समजेल आणि आपण सुद्धा या स्तोत्राचे नियमित पठन कराल.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष असे महत्व असून, या महिन्यात शिव धर्मिक बांधव भगवान शिव यांची आराधना करीत असतात. भाविक या महिन्यात भगवान शिव यांची आराधना करण्यासाठी शिव महिमा स्तोत्राचे वाचन करीत असतात.

शिवमहिम्न स्तोत्राची दंत कथा – 

शिव महिमा स्तोत्राबाद्द्ल असे सांगण्यात येते की,  शिव महिमा स्तोत्राची रचना पुष्पदंत नामक शिव भक्ताने केली आहे. या बाबत दंत कथा अशी आहे की, चित्ररथ नामक एक राजा होता. तो राजा शिव भक्त होता. त्या चित्ररथ नामक राजाने शिवाची आराधना करण्यासाठी आपल्या मह्लाच्या बागेत खूप सुंदर सुंदर रंगाची फुलांची झाडे लावली होती. राजा शिवाच्या चरणी रोज या बागेतील फुले अर्पण करीत असे.

एके दिवशी पुष्पदंत नामक राजा येथून जात असता त्याच्या दृष्टीस ही बाग पडली आणि त्या बागेतील रंगबेरंगी फुले पाहून स्तब्ध झाला. त्याला वाटले आपण या बागेतील फुले भगवान शंकराला अर्पण करू जेणेकरून भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील.

राजा पुष्पदंत महादेवाची आराधना करण्यासाठी या बागेतील फुले दररोज चोरून तोडू लागला आणि शिवला अर्पण करू लागला. त्यामुळे राजा चित्रगंध यांना पूजा करण्यासाठी फुले मिळत नसत. बागेत फुलं दिसत नसल्याने ते आपल्या बागेतील माळीदारांना शिक्षा करीत असत.

माळीदारांनी चोर पकडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो काही त्यांच्या हाती लागला नाही. कारण, राजा पुष्पदंत यांच्याजवळ एक दिव्य शक्ती होती त्यामुळे ते कोणास दिसत नसत. तेव्हां राजा चित्रगंध यांनी यावर उपाय म्हणून एक युक्ती केली.

भगवान शिव यांना अर्पण करण्यात आलेली बेल फुले त्यांनी बागेच्या आवारात पसरून दिली. राजा पुष्पदंत यांना याबद्दल काहीच कल्पना नसल्याने ते नेहमी प्रमाणे फुले तोडू लागले. परंतु फुले तोडत असतांना त्यांच्या पायी महादेवाला अर्पण करण्यात आलेली बेल फुले तुडवल्या गेली. परिणामी राजा पुष्पदंत यांच्याजवळ असलेली लुप्त होण्याची शक्ती नष्ट झाली. तेंव्हा माळीदारांनी राजा पुष्पदंत यांना पकडून राजा चित्रगंध यांच्याकडे नेल राजा चित्रगंध यांनी पुष्पदंत यांना कोठडीत कोंडून ठेवलं.

राजा पुष्पदंत यांना आपण केलेल्या चुकीचा पश्ताताप झाला. तेंव्हा त्यांनी मनोभावे शिवांची आराधना केली आणि भगवान शिव यांची स्तुती करण्यासाठी शिव महिमा स्तोत्राची रचना केली. भगवान शंकर राजा पुष्पदंत यांच्या आराधनेला प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा पुष्पदंत यांनी केलेली चूक माफ करून त्यांना पुन्हा त्यांची दिव्य शक्ती प्रदान केली. अश्या प्रकारे या शिव महिमा स्तोत्राबद्द्ल दंतकथा प्रचलित असून या स्तोत्राचे मनोभावे पठन केल्यास आपणास देखील भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

संग्रहक – वे.श्री.ईश्वर स्वामी होळीमठ ( ज्योतिष शास्त्री ) सोलापुर .


 Give Feedback



 जाहिराती