सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
  • एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री बनवण्यात आलं, त्यांनी कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर केली; ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाची चिरफाड
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 जिल्हा

राज्यातील १० नगर पंचायती आणि परिषदांच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

डिजिटल पुणे    13-08-2026 15:48:52

मुंबई : राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने विशेष पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध १० नगरपंचायती, नगरपरिषदांच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्ष दीड वर्षात राज्य शासनाने सुमारे १०० पेक्षा अधिक शहरांच्या विकास योजनांना मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केलेल्या विकास आराखड्यांमध्ये जिवती (चंद्रपूर), शिरूर अनंतपाळ, रेणापूर (लातूर), सोयगाव (छत्रपती संभाजीनगर), पालम (परभणी), उमरखेड (यवतमाळ), बीड, कोरपना, गडचांदूर (चंद्रपूर) आणि पुलगाव (वर्धा) यांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यातील नागरी सुविधा सुधारण्यासह आणि शहरीकरणाला शिस्तबद्ध रूप देण्यावर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत विकास आराखड्यांना मंजुरी दिली जात असून, शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे हे उद्दिष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. विकास आराखडे मंजूर झाल्यामुळे रस्ते, बगीचा, क्रीडांगण, ग्रंथालय, दुकाने, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन सार्वजनिक सुविधांसाठी जागा आरक्षित करून त्यांचा नियोजित विकास करणे शक्य होणार असून शाळा, रुग्णालये आणि उद्याने यांसारख्या सामाजिक सुविधांसाठी योग्य जागा उपलब्ध होऊन नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध त्याद्वारे होण्यास मदत होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती