सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर; ‘प्रेरणास्थळा’चे करणार उद्घाटन, शरद पवार यांनी दिली माहिती
  • मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
  • मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
  • विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
 DIGITAL PUNE NEWS

पावसाच्या सरींतही जिद्द कायम; विभा मुळेची ८० मिनिटांची नॉन-स्टॉप स्केटिंग कामगिरी

डिजिटल पुणे    18-08-2026 11:13:23

पुणे : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना पुण्यातील MIS Little Skating Champion विभा नृसिंह मुळे हिने आपल्या जिद्द आणि आत्मविश्वासाची अनोखी झलक दाखवत सलग ८० मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग करून विशेष कामगिरीची नोंद केली.८०व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित “Non-Stop 80 Minutes Skating Challenge” मध्ये विभाने उत्स्फूर्त सहभाग घेत हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. या उपक्रमातून राष्ट्रीय विक्रमाच्या विशेष प्रयत्नाचा भाग बनण्याचा मान तिला मिळाला.

पावसाच्या सरी सुरू असतानाही थांबली नाही विभाची स्केटिंगची गती! श्रावणातील अधूनमधून बरसणारा पाऊस, देशभक्तीपर गीतांचा उत्साह आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा वातावरणात विभाने तब्बल ८० मिनिटे आत्मविश्वासाने स्केटिंग करत आपले आव्हान पूर्ण केले.

विभाच्या या कामगिरीतून जिद्द, चिकाटी, शिस्त, सहनशक्ती आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा प्रेरणादायी संदेश मिळाला. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयापासून विचलित न होता प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते, हे तिच्या कामगिरीने अधोरेखित केले.

या उल्लेखनीय सहभागाबद्दल विभाला Miracle Book of Records आणि Vishva Book of Records यांची दोन अधिकृत विक्रम प्रमाणपत्रे तसेच ट्रॉफी प्रदान करण्यात आली. हा गौरव विभा आणि तिच्या कुटुंबीयांसाठी आनंद व अभिमानाचा क्षण ठरला.या उपक्रमाचे आयोजन Roller Skating Sports Federation of India यांच्या वतीने करण्यात आले होते. Skateathlon & Waveboard Sports Maharashtra Association यांचे संलग्न सहकार्य लाभले.

विभाच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक स्केटिंग कोच सचिन शिंदे सर आणि सुनील कांबळे सर यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले. तसेच कार्यक्रमाच्या नोंदणी, समन्वय, कार्यक्रमस्थळी पोहोचण्याची व्यवस्था आणि अल्पोपहारासाठी इंजि. प्रिन्स कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विभाने आपल्या कामगिरीतून “कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न थांबवायचे नाहीत” हा प्रेरणादायी संदेश दिला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण MIS परिवाराचा गौरव वाढला आहे.विभा नृसिंह मुळे हिचे मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या उज्ज्वल आणि यशस्वी स्केटिंग प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!


 Give Feedback



 जाहिराती