सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर; ‘प्रेरणास्थळा’चे करणार उद्घाटन, शरद पवार यांनी दिली माहिती
  • मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
  • मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
  • विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
 शहर

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम ;शास्त्रीय नृत्यशैलींची सांस्कृतिक संध्या

डिजिटल पुणे    18-08-2026 14:21:28

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत   ‘लक्ष्य’ या नृत्य  कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवन, सरदार नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम  शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था (एसएनएसएस) यांच्या वतीने  प्रस्तुत  करण्यात येत आहे.‘लक्ष्य’ या कार्यक्रमात भारतातील तीन विविध शास्त्रीय नृत्यशैलींची स्वतंत्र सादरीकरणे रसिकांना अनुभवता येणार आहेत. 

मणिपुरी नृत्यशैलीचे सादरीकरण मुंबईच्या प्रख्यात नृत्यगुरू आणि नामवंत कलावंत गुरू लतासना देवी करणार आहेत. बंगळुरू येथील शिवरंजनी हरीश भरतनाट्यमचे सादरीकरण करणार असून, पुण्याच्या पूजयिता भट्टाचार्य ओडिसी नृत्य सादर करणार आहेत.भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेतील विविधता, सौंदर्य आणि अभिव्यक्तीचे दर्शन घडविणारा ‘लक्ष्य’ हा कार्यक्रम पुण्यातील नृत्यरसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. तीन वेगवेगळ्या शास्त्रीय नृत्यशैलींचे स्वतंत्र एकल सादरीकरण एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा ३०१ वा कार्यक्रम असून, सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती