सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 क्राईम

नसरापूरनंतर जुन्नर हादरले; ९ वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर हत्या, संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात

डिजिटल पुणे    19-08-2026 15:11:34

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळवंडी गावात मंगळवारी (१८ ऑगस्ट) दुपारी ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, मुलीला घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत सायकलवरून शेताच्या परिसरात नेल्याची माहिती समोर आली.

शेत परिसरात मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले असून, तपासाचा आढावा घेतला जात आहे. विविध तपास पथकांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि तपास जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ही घटना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या गावातच घडल्याने परिसरात अधिकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असून, घटनेमागील संपूर्ण सत्य तपासातून स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती