सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अविष्कार स्पर्धेनिमित्त अभिमुखता(ओरिएंटेशन) कार्यक्रम;विद्यार्थ्यांना संशोधक बनविणारे व्यासपीठ म्हणजे अविष्कार संशोधन स्पर्धा : डॉ. शंकर लावरे

डिजिटल पुणे    20-08-2026 10:09:54

पुणे : विद्यार्थ्यांना संशोधक बनविणारे अविष्कार संशोधन स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यातील छोट्या छोट्या कल्पनांचा विस्तार झाला तर संशोधनाचा एक मोठा वटवृक्ष तयार होऊ शकतो असे मत ट्रिनिटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेसाठी तयारी करताना लागणाऱ्या मूलभूत गोष्टींची ओळख करून दिली. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शैक्षणिक व संशोधन समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीस चालना मिळावी यासाठी ट्रिनिटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.

महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करून मुलांना संशोधनासाठी  स्वतःच्या कल्पनाशक्तीचा, कुशलतेचा व ऊर्जेचा कसा उपयोग करावा यावर मार्गदर्शन केले.  महाविद्यालयीन स्तरावर अशा व्याख्यानांचे आयोजन केल्याने मुलांमध्ये संशोधनाविषयी आवड निर्माण होते व त्यांच्यात संशोधनाबद्दल सकारात्मक बदल होऊन उच्च शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो असेही त्यांनी  सांगितले . 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने महाविद्यालयीन व अंतर महाविद्यालयीन स्तरावर, अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व 3२५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे  उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ.  शुभांगी औटी,  डॉ. शुभांगी शिंदे, सा. फु.पु. विद्यापीठ अविष्कार स्पर्धा कमिटी जिल्हा समन्वयक  व आयक्यूएसी समन्वक डॉ. लतेश निकम, डॉ. किरण रणदिवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना श्रीचिप्पा, पाहुण्यांची ओळख  डॉ. किरण रणदिवे तर आभार प्रदर्शन डॉ. शुभांगी शिंदे यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती