सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 शहर

अजून किती निष्पापांचे जीव गेल्यानंतर पुणे महानगरपालिका जागी होणार? — प्रमोद नाना भानगिरे(शिवसेना पुणे

डिजिटल पुणे    21-08-2026 12:50:56

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांसोबतच मुक्या प्राण्यांचे जीवही धोक्यात आले आहेत. हडपसरमधील कृष्णानगर–महादेववाडी परिसरात चेंबरला झाकण नसल्याने दोन निष्पाप कुत्र्यांची पिल्ले चेंबरमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील महाळुंगे परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडलेल्या एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांनंतरही प्रशासनाला जाग येत नसेल, तर अजून किती निष्पापांचे जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासन गंभीर होणार आहे, असा संतप्त सवाल शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केला आहे.

उघडी चेंबर्स, जीवघेणे खड्डे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. राजकारणासाठी टीका करणे हा शिवसेनेचा उद्देश नसून प्रशासनाची संवेदनशीलता संपत असेल तर नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवणे ही आमची जबाबदारी आहे. महापालिकेने तातडीने सर्व उघडी चेंबर्स सुरक्षित करावीत आणि जीवघेणे खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती