सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 जिल्हा

मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण

डिजिटल पुणे    21-08-2026 14:28:34

नागपूर : मिहान इंडिया लिमिटेडतर्फे सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताच्या उपक्रमांसाठी सीएसआर निधीचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध संस्था आणि नागपूर महानगरपालिकेला एकूण १ कोटी ३५ लाख रुपयांचे धनादेश आज रामगिरी या मुख्यमंत्री निवासस्थानी प्रदान करण्यात आले.

यामध्ये जीविका फाऊंडेशनला सर्व्हायकल कॅन्सरच्या लसीकरण अभियानासाठी २५ लाख रुपये देण्यात आले. नागपूर महानगरपालिकेला सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३५ लाख रुपये, तर महिला सक्षमीकरण प्रकल्पासाठी ३५ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणासाठी १० लाख रुपयांचा निधी महापालिकेला देण्यात आला. याशिवाय वूमन्स एज्युकेशन सोसायटी, नागपूर येथील महाविद्यालयीन इमारत आणि सभागृहाच्या नूतनीकरणासाठी ३० लाख रुपयांचा सीएसआर निधी देण्यात आला. या निधीमुळे आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि नागरी सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे.या वेळी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती