सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
 क्राईम

विलेपार्लेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मेसेज करून भेटीस बोलावलं, शिक्षकाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    22-08-2026 15:25:27

मुंबई (विलेपार्ले) : मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरात 16 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 47 वर्षीय शिक्षकाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. गणेश देवळूखकर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲपवरून भेटीसाठी बोलावलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक आणि संबंधित अल्पवयीन मुलगी एकमेकांच्या परिचयातील आहेत. आरोपीने मुलीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप आहे. मुलगी भेटण्यासाठी गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गैरवर्तन केल्याचा आरोप

भेटीदरम्यान आरोपीने मुलीचा हात पकडून तिला ओढले आणि तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडितेने केला आहे. या घटनेनंतर मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात BNS कलम 75(3) तसेच पोक्सो कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून ताब्यात घेतले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती