पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘भाव स्वर तरंग’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार,दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे लोकसंगीत आणि भक्तिसंगीत यांचे सादरीकरण या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणाऱ्या या कार्यक्रमात शाहीर गुरुप्रसाद नानिवडेकर हे प्रमुख सादरकर्ते असून त्यांच्या सोबत मेघना झुझम, रामकृष्ण करंबेळकर, मनोहर अत्रे, लक्ष्मी जयस्वाल, दुर्गा शिंदे आणि आदित्य नानिवडेकर हे सहकलाकार सहभागी होणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा ३०२ वा कार्यक्रम असून सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.