पुणे: मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी Quick Heal यांच्या ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या उपक्रमांतर्गत पुण्यात सायबर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. Maharashtra Cyber यांच्या सहयोगाने राबविण्यात येणाऱ्या या वर्षीच्या उपक्रमाची थीम ‘My Data, My Responsibility’ अशी आहे.

या दोन महिन्यांच्या अभियानामध्ये आतापर्यंत पुणे शहरातील Hadapsar, Kondhwa आणि Pune Camp परिसरातील ७ हून अधिक शाळांमध्ये १२ जनजागृती सत्रे घेण्यात आली असून, २,००० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात आला आहे. या अभियानात प्रामुख्याने इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येत आहे.
या उपक्रमात Sir Parshuram Bhau College येथील B.Sc. Computer Science द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी Trupti Kuchekar आणि त्यांचे सहकारी Soham Bhagwat सहभागी आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी केवळ माहिती देण्याऐवजी त्यांना दैनंदिन डिजिटल जीवनातील संभाव्य धोके ओळखता यावेत आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करता यावे, यावर सत्रांमध्ये विशेष भर देण्यात येत आहे.

व्याख्यानाऐवजी संवादात्मक जनजागृती
सायबर सुरक्षेचे विषय विद्यार्थ्यांना सहज समजावेत यासाठी पारंपरिक पद्धतीने केवळ व्याख्यान न देता प्रश्नोत्तरे, खेळ, संवाद, वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि विविध interactive activities यांच्या माध्यमातून सत्रे घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या ऑनलाइन अनुभवांबद्दल बोलण्याची संधी देऊन त्या परिस्थितीत सुरक्षितपणे कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले जाते.
सत्रांमध्ये Online Gaming, Free App Traps, Personal Information Safety, Online Friends, Safe Social Media, Safe Websites, OTP Safety, ‘Golden Key’, Strong Passwords, Online Bullying, AI आणि Deepfakes, Two-Factor Authentication (2FA), Digital Rights आणि Digital Footprint यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच विद्यार्थ्यांना Endless Scrolling आणि डिजिटल व्यसन, तसेच Admission, Job आणि Loan संबंधित Targeted Scams यांसारख्या डिजिटल धोक्यांची माहिती देण्यात आली. Phishing, Vishing, Smishing, संशयास्पद Links आणि विविध Online Scams ओळखण्याच्या पद्धती आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनाही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या.
सायबर गुन्हा घडल्यास काय करावे?
उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सायबर गुन्हा घडल्यानंतर घाबरून न जाता त्वरित योग्य पद्धतीने प्रतिसाद देणे. ‘Rapid Response’ या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याची तक्रार कुठे आणि कशी नोंदवायची, संबंधित हेल्पलाइनचा उपयोग कसा करायचा, ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच Cyber Stalking आणि Online Bullying संदर्भातील तक्रारी कुठे नोंदवता येतात, याबाबत माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या सत्रांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाइन अनुभवांबद्दल प्रश्न विचारले. शिक्षकांनीही सत्रांच्या संवादात्मक पद्धतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन डिजिटल वापरातील छोट्या सवयींमुळे कोणते धोके निर्माण होऊ शकतात आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, हे प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजावून देण्यात आले.
सायबर सुरक्षेची जाणीव लहान वयापासून निर्माण होणे आवश्यक असल्याने, ‘My Data, My Responsibility’ या संदेशातून विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक माहितीची जबाबदारी स्वतः घेण्यास आणि डिजिटल जगात अधिक सजग व सुरक्षितपणे वावरण्यास प्रोत्साहित केले जात आहे.हे अभियान सध्या सुरू असून पुढील टप्प्यातही विविध शाळा व समुदायांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्रे घेण्यात येणार आहेत.