सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 शहर

मराठवाडा मित्र मंडळ ट्रस्ट चा शैक्षणिक सहकार्य, संशोधन करार

डिजिटल पुणे    25-08-2026 14:59:09

पुणे: मराठवाडा मित्र मंडळ ट्रस्टने विद्या प्रतिष्ठान ट्रस्ट आणि शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स(बारामती)यांच्याशी  शैक्षणिक सहकार्य, संशोधन  करार केला आहे. तसेच मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कर्वेनगर, पुणे आणि भक्तिवेदांत रिसर्च सेंटर, पुणे यांच्यात  सहकार्य   करार  करण्यात आला आहे.

विद्या प्रतिष्ठान ट्रस्ट आणि शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स(बारामती) करारप्रसंगी प्राचार्य डॉ. सचिन साखरे, उपप्राचार्य श्रीमती स्वाती देशमुख;आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे प्रमुख डॉ.धनराज धोत्रे ,बारामती विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे उपस्थित होते.या सहकार्याचा भाग म्हणून या संस्था संयुक्तपणे संशोधन प्रकल्प,चर्चासत्रे आणि प्राध्यापक विकास कार्यक्रम राबवतील, तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाण उपक्रम हाती घेतील. या करारामध्ये अभ्यासक्रम रचनेसाठी सहाय्य, इंटर्नशिप, नोकऱ्या, लाइव्ह प्रोजेक्ट्स, प्रत्यक्ष प्रशिक्षण, उद्योग भेटी आणि अतिथी व्याख्याने यांचाही समावेश आहे.  

मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कर्वेनगर, पुणे आणि भक्तिवेदांत रिसर्च सेंटर, पुणे यांच्यात झालेल्या शैक्षणिक सहकार्य, संशोधन करार प्रसंगी मराठवाडा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्राचार्य डॉ.सचिन साखरे, उपप्राचार्य सौ.स्वाती देशमुख, विभागप्रमुख डॉ.ए.एस. भातलवंडे,रमेश पंडित,भक्तिवेदांत रिसर्च सेंटरचे प्रा.डॉ.के.एन.धुमाळ,डॉ.सुमंत रुद्र, प्रा.डॉ.जनार्दन चितोडे, संजय भोसले,भूषण कुमार आणि कदंब कानन प्रभू  उपस्थित होते.या सामंजस्य करारांतर्गत संयुक्त कार्यशाळा, परिसंवाद, फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम, संशोधन उपक्रम, विद्यार्थी कल्याण व मूल्याधारित शिक्षण, सामाजिक उपक्रम तसेच शैक्षणिक देवाणघेवाण राबविण्यात येणार आहे. भारतीय ज्ञान प्रणाली आणि सार्वत्रिक मानवी मूल्यांचा आधुनिक शिक्षणाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी वाढविणे, हा या सहकार्याचा प्रमुख उद्देश आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती