सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 शहर

‘उडान’मधून नव्या स्वप्नांना भरारी: भारतीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रारंभ

डिजिटल पुणे    26-08-2026 11:01:09

पुणे : भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी ‘उडान’ या तीन दिवसीय इंडक्शन कार्यक्रमाचे नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. नवीन शैक्षणिक वातावरणाशी विद्यार्थ्यांची ओळख करून देणे, तंत्रशिक्षणाच्या विविध पैलूंची माहिती देणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे येथील सहाय्यक सहसंचालक श्री. एस. पी. दाते तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे येथील प्रादेशिक संचालक श्री. प्रतीक भरणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ऋषिकेश देशमुख होते. कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक म्हणून सौ. सुजाता पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.

प्रमुख पाहुणे श्री. एस. पी. दाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रशिक्षण क्षेत्रातील बदलत्या संधी आणि भविष्यातील आव्हानांवर प्रकाश टाकला. श्री. प्रतीक भरणे यांनी पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये अभियंत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली.प्राचार्य श्री. ऋषिकेश देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली. यावेळी विविध विभागांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

डॉ. महारुद्र कपसे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी संवादकौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. अनुशा मांढरे यांनी प्रभावी संवाद, आत्मविश्वास आणि योग्य संवादशैली ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच भविष्यातील करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची कौशल्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सौ. सुजाता पाटील यांनी एनपीटीईएल आणि स्वयम् या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठांचा प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. क्रीडा विभागाच्या वतीने डॉ. प्रशांत शिंदे आणि सौ. अनिता मुथा यांनी विविध क्रीडा उपक्रम, सहभागाच्या संधी तसेच क्रीडेमुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक विकासाचे महत्त्व सांगितले.सौ. अश्विनी गोखले यांनी परिणामाधिष्ठित शिक्षण अर्थात ‘आउटकम बेस्ड एज्युकेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. सौ. जागृती ठाकरे यांनी कला मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्री. उपमन्यू बंगाळे यांनी डिप्लोमानंतर उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी मा. अभिषेक वायकोळे यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.श्री. चेतन पाटील यांनी परीक्षा विभागाविषयी मार्गदर्शन केले. सौ. विद्या खोबरे आणि सौ. जागृती कडू यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अमितराव पाटील यांनी विविध विभागप्रमुखांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. श्री. तानाजी कणसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. आर्या टिकेकर आणि कु. प्रज्ञेश आल्हाट यांनी केले.या कार्यक्रमाला प्रथम वर्षाचे विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक मार्गदर्शन, कौशल्यविकास, करिअरच्या संधी, सामाजिक बांधिलकी, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध पैलूंना स्पर्श करणारा ‘उडान’ हा इंडक्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासासाठी प्रेरणादायी ठरलानव्या स्वप्नांना दिशा आणि उज्ज्वल भविष्यासाठी आत्मविश्वास देणारा ‘उडान’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


 Give Feedback



 जाहिराती