सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 शहर

'क्वांटम कम्प्युटिंग' वरील ५ दिवसीय कौशल्य विकास कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

डिजिटल पुणे    26-08-2026 12:55:12

पुणे : मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथील संगणक अभियांत्रिकी विभागात 'क्वांटम कम्प्युटिंग'या विषयावर ५ दिवसीय कौशल्य विकास कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.या कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये  संगणक अभियांत्रिकी  तसेच   इलेक्ट्रॉनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग  शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यशाळेत क्यूबिट्स, सुपरपोजिशन, डिरॅक नोटेशन,क्वांटम गेट्स,टेन्सर प्रॉडक्ट्स,फेज,फेज किकबॅक,एंटॅंगलमेंट,बेल स्टेट्स,सुपरडेंस कोडिंग,नो-क्लोनिंग प्रमेय,क्वांटम की डिस्ट्रिब्युशन,डॉइच अल्गोरिदम,ग्रोव्हर अल्गोरिदम,क्वांटम फूरिअर ट्रान्सफॉर्म,शॉर्स अल्गोरिदम, यांसारख्या विषयांवर चर्चा झाली.'क्वांटम कम्प्युटिंग'  सारख्या उदयोन्मुख आणि नवीन क्षेत्रात पदार्पण करताना या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत  मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयचा संगणक विभाग आणि 'अल्गो असायलम'   यांच्या मध्ये  परस्पर सहकार्य  करारावर  स्वाक्षरी करण्यात आली.

या प्रसंगी, 'अल्गो असायलम' चे संस्थापक डॉ.श्रीरंग करंदीकर,आय हब-क्यू टी एफ,आयआयएसईआर,पुणे  येथील तज्ज्ञांनी  मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.सरिता सपकाळ,स्वरूपा देशपांडे, अनुपमा पंडित यांनी  जबाबदारी पार पाडली.या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. सचिन साखरे,उपप्राचार्या डॉ.स्वाती देशमुख,संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ.संकीर्ती शिरवले यांचे सहकार्य लाभले.

कार्यशाळेला सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, क्वांटम कम्युनिटीच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. दि.१५ ऑगस्ट  ते १९ ऑगस्ट  २०२६ दरम्यान हा कौशल्य विकास कार्यक्रम  झाला .


 Give Feedback



 जाहिराती