सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 विश्लेषण

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट! जुलैचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात; पेमेंट स्टेटस असे तपासा

डिजिटल पुणे    26-08-2026 15:01:46

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र लाभार्थी महिलांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातही निधी जमा होण्याची शक्यता आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पैसे जमा झाले नाहीत तर काय कराल?

काही लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप निधी जमा झाला नसेल, तर त्यांनी काही महत्त्वाच्या बाबी तपासणे आवश्यक आहे. सर्वप्रथम बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे का आणि योजनेचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे का, हे तपासा.

ई-केवायसी कशी पूर्ण कराल?

1. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

2. ‘ई-केवायसी’ पर्यायावर क्लिक करा.

3. आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून पुढे जा.

4. आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला OTP नोंदवा.

5. मागितलेली आवश्यक माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा.

6. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्याची स्टेटस पुन्हा तपासा.

7. बँक खाते आधारशी लिंक नसल्यास संबंधित बँकेशी संपर्क साधून आधार सीडिंग करून घ्या.

ई-केवायसी असूनही पैसे आले नाहीत?

ई-केवायसी पूर्ण असूनही सन्मान निधी जमा झाला नसेल, तर योजनेच्या पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासावी. यासोबतच बँक खाते सक्रिय आहे का, आधार लिंक आहे का आणि DBTद्वारे रक्कम स्वीकारण्याची सुविधा सुरू आहे का, हेही तपासणे महत्त्वाचे आहे.जुलै महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाल्याने रक्षाबंधनाच्या काळात राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती