सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 जिल्हा

आयुर्वेद औषध उत्पादकांच्या अडचणी सकारात्मक पद्धतीने सोडवा – राज्यमंत्री योगेश कदम

डिजिटल पुणे    26-08-2026 16:13:55

मुंबई : आयुर्वेद औषध उत्पादकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सकारात्मक पद्धतीने सोडवाव्यात. कारवाई झालेल्या औषध उत्पादकांच्या प्रकरणांचा प्रकरणनिहाय आढावा घेऊन त्यांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुदत द्यावी आणि त्यानंतरच पुढील कारवाई करावी, असे निर्देश राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

केंद्र शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी करताना परिस्थितीनुरूप काही बदल आवश्यक असल्यास त्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारशी पाठवाव्यात. सध्याच्या नियमांमुळे उत्पादकांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन मोठ्या आणि छोट्या औषध उत्पादकांची वर्गवारी करावी. त्यानुसार नियमांच्या विभागणीबाबतही केंद्र शासनाकडे शिफारस पाठवता येईल, असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमधील प्रयोगशाळांना औषध तपासणीचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही करावी आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्र शासनाचे कायदे आणि नियम यांची आयुर्वेद औषध उत्पादक उद्योजकांना माहिती व्हावी, यासाठी कार्यशाळांचे आयोजन करावे, असे निर्देशही राज्यमंत्री कदम यांनी दिले. यावेळी सहआयुक्त गणेश रोकडे, आयुर्वेद औषध परवाना प्राधिकरण अधिकारी अदिती कुलकर्णी, आयुष स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष दीपक महाजन, सहसचिव धनवडे आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती