सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

श्रावण महिना सुरू होताच सर्व सुहासिनींना ओढ लागते ती मंगलमय मंगळागौरीची!

MSK    27-08-2026 19:36:48

श्रावण महिना सुरू होताच सर्व सुहासिनींना ओढ लागते ती मंगलमय मंगळागौरीची!

आज 26 ऑगस्ट रोजी मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे मॅडम यांच्या संकल्पनेतून  माता-पालक आणि त्यांच्या मुलांसाठी मंगळागौरीचा सुंदर कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.

पाचवारी आणि नऊवारी साड्यांमध्ये नटलेल्या, पारंपरिक दागिने व साजेसा शृंगार केलेल्या आधुनिक मातांनी पारंपरिक वेशभूषेत मंगळागौरीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.यामुळे संपूर्ण वातावरणाला मराठमोळ्या संस्कृतीचा सुंदर साज चढला होता.

श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित या मंगळागौरीमध्ये या सणातील पारंपरिक खेळांबरोबरच विविध गमतीदार, मनोरंजक आणि आनंददायी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक तसेच जुन्या गाण्यांच्या तालावर महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळ सादर केले आणि कार्यक्रमात रंगत आणली.

यामध्ये महिलांसाठी काही हटके आणि खास खेळही ठेवण्यात आले होते. चिठ्ठीत दिलेला शब्द पाहून उखाणा घेणे, तसेच आपल्या संस्कृतीशी निगडित आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न त्यांना विचारले गेले अशा मजेशीर उपक्रमांमधून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या खेळांमुळे कार्यक्रमात हास्य, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ साधत, मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचा आनंद घेत आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीचे जतन करत हा उत्सव अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. आई आणि मुलांना एकत्रितपणे आनंदाचे क्षण अनुभवता आले, ही या उपक्रमाची विशेष सुंदर आठवण ठरली


 Give Feedback



 जाहिराती